डॉ.शिवाजी शिंदे यांच्या ‘ अंतःस्थ हुंकार ‘ या काव्यसंग्रहाला ” साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर
पुणे |
मातंग साहित्य परिषद, पुणे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र व समरसता साहित्य, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने देण्यात येणारा ” साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असलेले डॉ.शिवाजी शिंदे यांच्या ” अंतःस्थ हुंकार ” या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ : ०० वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह,मुख्य इमारत,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. मा.डॉ.कारभारी काळे, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी मा.आमदार सुनील कांबळे,मा.प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
डॉ.शिवाजी शिंदे यांच्या पहिल्या ‘ कैवार ‘ या काव्यसंग्रहाला एकूण ३४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना एकूण १७ पुरस्कार मिळाले आहेत.दोन्ही मिळून त्यांना आजवर एकूण ५१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस मॅडम, प्र-कुलगुरू डॉ.राजेश गादेवार सर,आयक्युएसी चे संचालक प्रा.डॉ.विकास पाटील सर,कुलसचिव योगिनी घारे मॅडम,सर्व संवैधानिक अधिकारी,संकुल संचालक,शिक्षकवृंद,प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ.शिवाजी शिंदे यांचे अभिनंदन केले.