Latest Marathi News

BREAKING NEWS

डिपीचे फ्युज टाकताना शॉक लागून इन्स्टा स्टार संतोष मुंडेसह एकाचा मृत्यू, परिसरात शोककळा

0

बीड |

विजेच्या डीपीचे फ्युज टाकताना इन्स्टा स्टार संतोष मुंडे आणि त्याच्या मित्र बाबुराव मुंडे या दोघांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतोष मुंडे याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून त्याच्या या दुःखद निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अगोदर टिक-टॉक आणि त्यानंतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून संतोषने मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष आणि त्याच्या मित्र बाबुराव हे दोघेही धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील राहणारे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टा स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी या रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते.  यावेळी डीपीचे फ्युज टाकत असताना अचानक विज आल्यामुळे दोघांचाही करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
संतोष मुंडे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असायचा. त्याच्या व्हिडिओ बनवण्याच्या शैलीमुळे त्याला मोठ्या प्रमाणात लोक ओळखत होते. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्याच्या आवाजातील व्हिडिओ बनवायचा आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा. त्याच्या या व्हिडीओंना चाहते मोठा प्रतिसादही द्यायचे. संतोष मुंडेच्या अकाली निधनामुळे समाज माध्यमातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.