Latest Marathi News

BREAKING NEWS

जालना ही महाराष्ट्रातील २९ वी महानगरपालिका म्हणून घोषित राज्य सरकारची घोषणा

0

मुंबई |

जालनामधील नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करावे अशी मागणी केली जात होती. जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. नगर विकास उपसचिवांनी यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. तसेच नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येताच राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

जालना पालिकेने महापालिकेचा ठराव पाठवावा, तत्काळ महापालिकेला मंजुरी देता येईल, असे आदेश तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये जालन्याचा आढावा घेताना दिले होते. या निर्णयामुळे जालनाही आता राज्यातील 29 महापालिका घोषित करण्यात आले असून तसे आदेश काढलेले आहेत रूपांतर करण्याबाबत नगर विकासाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.