Latest Marathi News

BREAKING NEWS

“जयंत पाटील यांना पुन्हा ‘ईडी’ची नोटीस..!

0

मुंबई |

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पुन्हा ईडीने समन्स पाठवले आहे. २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. आयएल अँड एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीने बजावली होती.

परंतु जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी, असे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली होती.

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. याच व्यवहारांबद्दल पाटील यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.