Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती कॉलनीतील ओपन स्पेस प्रकरणी प्लॉट धारकाला दिलासा ; बार्शी सत्र न्यायालयाचा निर्णय

0

बार्शी |

शहरातील कुर्डुवाडी रोडवरील छत्रपती कॉलनीतील खुल्या जागेची (ओपन स्पेस) विक्री करू नये व स्थानिक रहिवाशांना या जागेच्या वापरास हरकत करू नये, असे
अंतरिम आदेश वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश ए. पी. खानोरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे मूळ मालक, संबंधित अधिकारी व खरेदीदार यांचे दणाणले आहेत.

त्यामुळे बनावट कागदपत्रे तयार करून शहरातील गट नंबर ६६८ मधील जागा एनए व गुंठेवारी ले आऊटमधील ओपन स्पेस जागा विकणाऱ्या भूखंड माफियांमध्ये एकच खळबळ माजली आहे. येथील स्थानिक रहिवासी विदुर कोल्हे, हनुमंत काळे, राजेश चोप्रा, विक्रम निमकर, रमेश देशमुख यांनी याबाबत अॅड. विकास जाधव यांच्यामार्फत न्यायालयामध्ये धाव घेतली होती. ही लढाई गेल्या सात वर्षापासून न्यायालयात प्रलंबित होती.

ओपन स्पेस जागा ही स्थानिक रहिवाशांच्या सामूहिक उपयोगासाठी असताना मळ मालकांनी कागदपत्रात
हेराफेरी करून व रहिवाशांची फसवणूक करून ओपन स्पेसची विक्री केली. त्यासाठी नगरपरिषदेने यांनी बेकायदेशीररीत्या गुंठेवारी करून त्यांना साथ दिली. तहसीलदार बेकायदेशीरपणे बिनशेती परवाना दिला.
त्यामुळे ओपन स्पेसचे खरेदी खत व गुंठेवारी व बिनशेतीचे आदेश रद्द करावेत, अशी मागणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्यासमोर अॅड. विकास जाधव यांच्यातर्फे करण्यात आली.

या प्रकरणात, दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत ओपन स्पेस जागेत खरेदीदार यांनी घुसखोरी करू नये. खरेदी खत आधारे मिळकतीचे पुढे हस्तांतरण करू नये, अशी तूर्तता मनाईची मागणी केली होती. त्यावर न्यायाधीशांनी आदेश पारित केले. प्लॉटधारकांच्या वतीने न्यायालयात अॅड. विकास जाधव, अॅड. अक्षय काशीद यांनी बाजू मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.