“चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र भेट…”
नागपूर |
दोन दिवसापासून नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांची आत्मचरित्र ‘माझी जीवनगाथा’ हे भेट दिली.
हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सीमावाद यासह महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती त्यावरून खडाजंगी पाहावयास मिळाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाबाहेर वेगवेगळ्या आंदोलने ही केली आहेत. वेगवेगळ्या कारणावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये खडा जंगी पाहावयास मिळत आहे, या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांचे आत्मचरित्र त्यांना भेट दिली.
संसदीय कामकाज मंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील काम करत आहेत, असताना सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम करत आहेत.