Latest Marathi News

BREAKING NEWS

“चंद्रकांतदादांनी केला मेट्रोतून प्रवास..!” त्यांनी यावेळी घेतला मेट्रो कामकाजाचा आढावा

0

पुणे |

पुण्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी गरवारे ते वनाज पर्यंतचा प्रवास मेट्रोतून केला. यावेळी शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची पाहणी करून कामाचा आढावा चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला. सध्या शहरातील मेट्रोचे काम अतिशय जलदगतीने सुरू असून जानेवारी अखेर शिवाजी नगर स्थानकापर्यंतचे काम पूर्ण होईल. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. त्याशिवाय स्थानकांचे ज्या पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे पुण्याच्या वैभवात अजून भर पडेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी गरवारे ते वनाज पर्यंतचा प्रवास तिकीट काढून केला. मेट्रोचा हा प्रवास खऱ्या अर्थाने अल्लाहदायक होता. या पाहाणी दौऱ्यावेळी महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव अण्णा तापकीर, सुनिलजी कांबळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.