Latest Marathi News

BREAKING NEWS

“चंद्रकांतदादांनी आयोजित केलेल्या सांघिक किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..!”

0

पुणे |

कोथरुड मतदारसंघात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आयोजित ‘सांघिक किल्ले बनवा स्पर्धे’चा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. यावेळी शाहीर हेमंत मावळे यांनी पोवाड्यातून शिवचरित्र उलगडले, तर शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवरायांचे कार्य आणि जीवन सर्वांनी अनुभवण्याचा सल्ला दिला.

चंद्रकांतदादा पाटील कोथरूड मतदारसंघांमध्ये विविध उपक्रम राबवत असतात, फिरते वाचनालय, गरजूंसाठी स्वेटर वाटप यासारखे उपक्रम दादा राबवत असतात, सांघिक किल्ले बनवा स्पर्धा दादांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती, त्याचा बक्षीस वितरण समारंभ २१ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला, यापूर्वीही मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे सहलीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता व सर्जनशीलता वाढली पाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रकांत दादांच्या माध्यमातून राबवले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.