पुणे |
पु ल देशपांडे यांच्या नावाने पूल महोत्सव हा पुणेकरांसाठी नवी पर्वणीच असतो त्याच्या बोधचिन्हाच्या अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पुल! गेल्या २० वर्षांपासून अव्याहतपणे लीशग्रीन क्रीएशन आणि आशय संस्कृतीच्या वतीने आयोजित केला जाणारा पुलं महोत्सव पुणेकरांसाठीच नव्हे, तर पुलंप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच असते. त्यामुळे याची ख्याती जगभर पसरली आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. मात्र, यंदा पुन्हा पुणेकर आणि पुलंप्रेमींना पुलं महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार असून, आज त्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ग्लोबल पुलोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. यावेळी ग्लोबल पुलोत्सवाचे सर्व आयोजक उपस्थित होते.