Latest Marathi News

BREAKING NEWS

“गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये….” – अंबादास दानवे

0

जळगाव |

पाचोरा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये, सभेत घुसलात तर परत जाणार नाही, असा थेट इशारा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या अनुषंगाने म्हटले की, चौकटीत बोला अन्यथा, तुमच्या सभेत घुसू, असा धमकी वजा इशारा दिला होता. तर यावर संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर मात्र अंबादास दानवे यांनी मस्तीची भाषा करू नये, सभेत घुसलात तर परत जाणार नाही असा थेट धमकीवजा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

नेमके काय म्हणाले दानवे?
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी आहेत. आम्हाला त्यांच्या सभेत घुसता येत नाही का? गुलाबराव पाटील यांनी मस्तीची भाषा करू नये, सभेत घुसलात तर परत जाणार नाही, त्यामुळे दादागिरीची भाषा करू नये. आम्ही सभेचे लावलेले बॅनर हे परवानगी घेऊन लावले आहेत, ते बॅनर काढायला नको, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

गुलाबराव पाटील यांचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, मला जळगावात घुसून तर दाखवा, असे आव्हन दिले होते. मी आलो. काल जळगावमध्ये आल्यानंतर मला अडवण्यासाठी कुणी उंदिर आलाय का? , हे आम्ही शोधत होतो. पण, कुणी सापडले नाही. काल मी आलो तेव्हा शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. या शिवसैनिकांच्या गर्दीत कुणी घुसेल? , असे वाटत नाही.

काय आहे गुलाबराव पाटलांचा इशारा?
आम्ही दगड मारून सभा, आंदोलन बंद करणारे लोक आहोत. खासदार संजय राऊत यांनी आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेआधी दिला आहे. संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. ते आज जळगावात माध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या या जळगाव दौऱ्यापूर्वीच गुलाबराव पाटील संतापले आहेत. गुलाबराव पाटील म्हणाले, माझे मित्र आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.