Latest Marathi News

BREAKING NEWS

खाजगी प्राथमिक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने 24 वर्षाची निवड श्रेणी मिळण्यासाठी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांना निवेदन देण्यात आले

खाजगी प्राथमिक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने 24 वर्षाची निवड श्रेणी मिळण्यासाठी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांना निवेदन देण्यात आले

0

खाजगी प्राथमिक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने 24 वर्षाची निवड श्रेणी मिळण्यासाठी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांना निवेदन देण्यात आले

लातूर : राज्य शासकीय व जिल्हा परिषद कर्मचा-याप्रमाणे खाजगी प्राथमिक शाळेतील लिपीक व सेवक पदावरील कर्मचा-यांना सुधारीत सेवांतर्गत प्रगती योजनेचा ( 24 वर्षाचा) लाभ मिळावा या मागणीचे निवेदन औसा मतदार संघाचे आमदार मा. अभिमन्यू पवार साहेब यांना लातूर जिल्हयातील शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने देण्यात आले.

जिल्हा परिषद व शासकीय कार्यालयातील काम करणा-या शिक्षकेत्तर कर्मचारी यांना हा लाभ दिला जातो. परंतू त्याच संवर्गातील खाजगी प्राथमिक शाळेतील काम करणा-या लिपीक व सेवक यांना लाभ न मिळणे हा अन्याय आहे. तरी हा अन्याय आपण मा. उपमुख्यमंत्री साहेब व मा. शिक्षण मंत्री साहेब यांच्या समोर मांडुन आम्हा लिपीक व सेवक यांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी यावेळी शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वतीने मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचेकडे करण्यात आली. या निवेदना संदर्भात आपण प्रयत्न करु न्याय मिळवून देऊ असे अश्वासन मा. आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी शिष्टमंडळास दिले. हे निवेदन देण्यासाठी नागुरे एन. एस. रामदास साबणे, तुकाराम साबणे, महारुद्र कचरे, शामराव कुलकर्णी, बालाजी आकडे, रवि शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, संतोष भस्मे सर, गिरीष बाचीपल्लीकर, तौफीन शेख सर, रमेश मिटकरी, फुटाणे पंडित इ. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.