Latest Marathi News

BREAKING NEWS

“क्रेडाई बार्शी शहराध्यक्षपदी सतीश अंधारे तर सचिव पदी समाधान पाटील यांची निवड…!”

0

बार्शी |

बार्शी क्रेडाईच्या शहराध्यक्षपदी साई डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा आता अध्यक्ष सतीश अंधारे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांची निवड ही पुढील दोन वर्षासाठी असणार आहे. क्रेडाई (CREDAI) म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया. ही एक राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे जी भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते. संस्था तिच्या सदस्यांच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील एकूण रिअल इस्टेट उद्योग सुधारण्यासाठी कार्य करते.

बार्शी क्रेडाईच्या सचिवपदी समाधान पाटील यांची ही निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी भरत परमार तर युथ विंग समन्वयकपदी अमित इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा ही आयोजित करण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आले आहेत. यावेळी मावळते अध्यक्ष चेतन जैन, ज्येष्ठ सदस्य भारत गायकवाड, नितीन देशमुख, अभिजीत सोनीग्रा, निलेश परमार, अमित कटारिया, भूषण कदम आधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.