कोल्हापूर |
कोल्हापूरमध्ये वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी लोकसभागातून फिरत पुस्तक घर उपक्रम सुरू करण्यात आला आहे, याचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये ही वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे या हेतूने हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे, कोल्हापूरकरांसाठी फिरते पुस्तक गृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवहानही त्यांनी केले. लोकसहभागातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता आल्याबद्दल त्यांनी आनंद ही व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील सर्व भागात हे फिरते वाचनालय उपलब्ध होणार असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असेही ते म्हणाले. एक जानेवारीपासून कोल्हापूरमध्ये फिरते बाल वाचनालय ही सुसज्ज असे चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

लॉकडाऊन मुळे कोल्हापूर मधील फिरते बालवाचनालय बंद करण्यात आले होते ते नव्या दुरुस्तीसह चालू करण्यात येणार आहे. यावेळी भाजप पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.