पुणे |
पुण्यातील कोथरुडमधल्या श्रावणधारा इमारतीतील सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागली होती,
अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आली आहे. पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील काही फ्लॅट्सना आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच चंद्रकांत पाटील बैठक आटोपून श्रावणधारा सोसायटीला भेट देऊन, इथल्या नागरिकांशी संवाद साधून सर्वांना धीर दिला. आगीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा बंद करण्यात आला असून, नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.