Latest Marathi News

BREAKING NEWS

काटा मारणारांचा काटा बसवू – शंकर गायकवाड

0

वैराग |

राज्यातील जे साखर कारखानदार उसाचा काटा मारून विविध मार्गाने शेतकऱ्यांची लूट करतील अशा कारखानदारांचा काटा कायमचा बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी बार्शी तालुक्यातील जवळगाव नंबर २ येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात पार पडलेल्या ऊस दर आंदोलनाच्या बैठकीमधून दिला. लवकरच अशा लुटारू कारखान्यांच्या विरोधात न्यायालयीन व रस्त्यावरील लढाई सुरू केली जाईल असेही गायकवाड यांनी बोलताना सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत कापसे व प्रकाश गुरव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन कापसे, सचिन आगलावे, नवनाथ कापसे, लहु डिसले, शहाजी डिसले, ज्ञानेश्वर पवार, संजय ढेंगळे, हणमंत कापसे, हत्तीजचे प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, रोहित पाटील, बालाजी डिसले, अशोक कापसे, सोनदेव डिसले, हनुमंत भूमकर, अभिमन्यू डिसले, नारायण डिसले, संभाजी ढेंगळे, नंदकुमार ढेंगळे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. बापू कापसे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.