Latest Marathi News

BREAKING NEWS

एकच पालक असलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांचं शैक्षणिक पालकत्व यापुढे माझं असेल – चंद्रकांत पाटील 

0

पुणे |

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या  मतदारसंघातील कर्वेनगर भागातील जिव्हाळा फाऊंडेशन संचालित अनुराधा पूर्व माध्यमिक शाळा आणि स्व. सुरेश मुठे मुलींचं वसतीगृह आहे. इथे आज भेट दिली. या शाळेत भटक्या विमुक्त जाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थिनी इंग्रजी माध्यमातून शिकताहेत आणि शाळेच्या वसतीगृहात राहतात. शाळेत भेट दिल्यावर मी नेहमीच लहान मुलांमध्ये रमतो. लहान मुलांशी संवाद साधताना,मला खूपच आनंदही मिळतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांना आज तर शाळेत शिक्षक होण्याची संधी मला मिळाली. शिक्षक म्हणून विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे दिले. सुकन्या समृद्धी योजनेद्वारे विद्यार्थिनींचं पालकत्वही स्वीकारलं. या शाळेत एकच पालक असलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांचं शैक्षणिक पालकत्वही यापुढे माझं असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

या मुलींनी एकमुखी ‘गुड मॉर्निंग’नं चंद्रकांत पाटील यांचं शाळेत स्वागत केलं. यावर मी गुड मॉर्निंगला मराठीत काय म्हणतात असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर मुलींकडे उत्तर नव्हतं. मग गुड मॉर्निंगला ‘सुप्रभात’ म्हणतात असं त्यांना सांगून सर्वांना चॉकलेटचं वाटप केलं. मग “माझ्याशी कोण बोलणार?” विचारताच, राजनंदनी नरेंद्रसिंह घोरपडे, रेखा भीमा शेट्टी आणि आरोही अविनाश तुपेकर या तिघी पुढे आल्या. मोठेपणी काय होणार, या प्रश्नावर तिघींनी डॉक्टर, पोलिस अधिकारी, शिक्षिका अशी उत्तरं दिली. त्यामुळे खूपच आनंद झाला. मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारतच्या संकल्पाविषयी चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.‌ “मी आता दिलेल्या चॉकलेटचा कागद इकडे-तिकडे न टाकता, कचरा पेटीतच टाकावा,” असं या मुलींना समजावलं.

विद्यार्थिनींशी संवादानंतर जिव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका ॲड. शर्वरी मुठे आणि अनुराधा शाळेच्या शिक्षिका सोनिया मारणे, निलिमा वाडकर, सुजाता जोशी, विनया चौधरी, योगिनी शिंदे, मोनिका कदम यांच्याशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन, सर्व‌ विद्यार्थिनींचे या माध्यमातून पालकत्व घेतले. पुण्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करावे आणि दुर्दैवानं ज्या विद्यार्थिंनीच्या एका पालकाचे निधन झाले आहे, अशा सर्व विद्यार्थिनींची माहिती संकलित करावी. या मुलींचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारेन, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.