पुणे |
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला. या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, ”कायदेशीर विषयावर मत व्यक्त करणं बरोबर नाही. मात्र, सत्याचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांना कामाख्या देवी प्रसन्न झाली. तर उद्धव ठाकरे यांनीही तिकडे जावे”, असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
‘आम्ही जसे खिलाडू वृत्ती ने घेतलं. तुम्ही पण घ्या, पण सरकार गेले आणि तुम्ही किर-किर केली. उद्धव ठाकरे यांनी आता बोलवं. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आयोगाच्या आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयावर कोणी बोलू शकत नाही. ३३ महिने यांनी सुडाचे सरकार चालवले. इतके दिवस सुडाचे राजकारण केले. महाराष्ट्रात हम चले सो कायदा चालू होता”, असा घणाघात यावेळी त्यांनी केला.
”विश्वासघात कसा केला हे सर्वांना माहिती आहे. पण प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतो”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला.