Latest Marathi News

BREAKING NEWS

“आमदार मोहिते-पाटील यांची मुस्लीम बांधवांबरोबर रोजा इफ्तार पार्टी…”

0

करमाळा |

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आवाटी येथील वलीबाबा दर्गाह येथे भेट देवुन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पवित्र रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते मुस्लीम बांधवांबरोबर मस्जिद येथे अजानमध्ये सहभागी होऊन रोजा इफ्तार पार्टीचा त्यांनी आस्वाद घेतला.

दरम्यान त्यांनी मुस्लीम बांधवांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, अजित तळेकर, शाबिर खान, राजु खान, नसरुल्लाह खान, युसुफ जहागिरदार, यशवंत बंडगर, गोकुळ नलवडे, राजाभाऊ शिंदे, संतोष सोनवर, लखन चिर्के, तात्या गोडगे, महेश पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.