Latest Marathi News

BREAKING NEWS

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

0

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी च्या बी.एड द्वितीय वर्ष सत्र तिसरे प्रशिक्षणार्थींच्या सराव अध्यापन व छात्र सेवाकाल शिबीर तथा शालेय आंतरवासिता उपक्रम अंतर्गत बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसील कार्यालय, बार्शी येथील निवासी नायब तहसिलदार मा. श्री. संजीवन मुंढे, अव्वल कारकून मा. श्री. ऋषिकेश धनवडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. जी. ए. चव्हाण, गट प्रमुख मार्गदर्शक डॉ.एम व्ही मते, अभिरुप मुख्याध्यापक प्रियंका देवकर, अभिरुप उपमुख्याध्यापक सुजाता वाघमारे, अभिरुप पर्यवेक्षक शैलेश देशमुख, बी एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अपर्णा पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांचे वृक्षरोप व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकारा दिनानिमित्त शाळेत घेतलेल्या प्रश्नमंजुषा या उपक्रमामध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गुणानुक्रमे दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. संजीवन मुंढे यांनी शालेय स्तरावर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा केल्याबद्दल बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले. माहिती अधिकाराबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. माहिती अधिकार यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणा सांगितली. मा. श्री. ऋषिकेश धनवडे यांनी माहिती अधिकार अंतर्गत आपण मागितलेली माहिती जर नाकारली गेली तर आपण काय करू शकतो याची क्रमबद्ध माहिती दिली. तसेच आपल्या अधिकारासोबतच आपले कर्तव्य आपण बजावले पाहिजे असे सांगितले. मा.श्री. जी.ए .चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप केला. स्वरांजली कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. सुजाता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील इयत्ता नववी तुकडी ड व ई या वर्गातील विद्यार्थी तसेच बी एड प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.