पुणे |
कोथरूड मतदारसंघातील ‘स्वस्तीश्री सोसायटी’त घरकाम करणाऱ्या ताईंच्या आरोग्यासाठी लोकसहभागातून अल्पदरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणाऱ्या तसंच त्यांचं विघटनही करणाऱ्या मशीनची सुरूवात करून त्याचं ८ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

चंद्रकांतदादाच्या माध्यमातून कोथरूड मतदार संघात वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. अवघ्या ५ रुपयांमध्ये कापडी पिशव्याची मशीन असो वा फिरते वाचनालय, सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून चंद्रकांत दादा हे मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले की, येत्या काळात कोथरूडमध्ये समृद्ध आणि आदर्श सोसायटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं या वेळी स्पष्ट केलं. नागरिकाला कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी थेट संपर्क करण्याचे आवाहन ही नागरिकाला केले आहे.