मुंबई |
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठयपुस्तकांचा वितरण सोहळा मुंबई विद्यापीठ येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास आमदार आशिष शेलार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार, नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन, नवी दिल्ली अध्यक्ष प्रा. के. के. अग्रवाल,अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली उपाध्यक्ष प्रा. एम. पी. पुनीया, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, महाराष्ट्रातील प्राध्यापक, विद्यार्थी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.