मुंबई |
अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती.
या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज तेथून होऊ लागले आहे.