Latest Marathi News

BREAKING NEWS

“अजित पवार माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच…!” – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जोपर्यंत अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असे त्यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप नाही तर सर्व राष्ट्रीय संघटना ज्यांना राष्ट्र आपला वाटतो, इतिहास आपला वाटतो ते आज व्यक्त झाले. अजित पवार असे कसे स्टेटमेंट देतात? मलाही अधिवेशनात तेव्हा आश्चर्यच वाटलं. जोपर्यंत अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.