नवी दिल्ली |
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंह याला मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. अमृतपाल गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
त्याला पकडण्यासाठी पंजाब पोलीस आणि भारतीय संरक्षण यंत्रणाकडून प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वीच अमृतपाल याचा खास साथीदार पप्पलप्रीत सिंह याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र अमृतपाल हा पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.