मुंबई |
अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण 6 फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. शिवसेनेनं आरोपही केला होता की, नोटाला पसंती देण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते. अजून दोन फेरींचा निकाल बाकी आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत ८ व्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे :
१) श्रीमती ऋतुजा लटके- २९०३३
२) श्री.बाला नाडार – ८१९
३) श्री.मनोज नायक – ४५८
४) श्रीमती नीना खेडेकर- ७८९
५) श्रीमती फरहाना सय्यद- ६२८
६) श्री.मिलिंद कांबळे- ३५८
७) श्री.राजेश त्रिपाठी- ७८७
आणि
नोटा -५६५५
एकूण मते : ३८५२७