Latest Marathi News

BREAKING NEWS

येत्या २४ तासात पालिकेचे कार्यालय खाली करा.. आदित्य ठाकरेंचा मंत्री लोढा यांना इशारा

0

मुंबई : मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेत कार्यालय दिलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि वरळी महारदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. पालकमंत्र्यांना महापालिकेत कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? त्यांनी तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं. येत्या २४ तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं केलं नाही तर मुंबईकर आपला राग दाखवतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

पुढे माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मंत्री असताना महापालिकेत बैठका घेतल्या. पण कुठेही असं दालन हडपलं नाही. हे थांबलं पाहिजे. बदलंल पाहिजे. नाही तर मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौरांना दालन दिलं पाहिजे. आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून महापालिकेत केबिन दिली पाहिजे. या दालनात पालकमंत्री नाहीत तर भाजपचे माजी नगरसेवक बसले होते.

आज नगरसेवकांची कार्यालये बंद केली. पण आता हे महापालिकेत घुसखोरी करून दादागिरी करत आहेत. हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे २४ तासात थांबलं नाही. केबिन खाली केली नाही तर कधी ना कधी तरी मुंबईकर राग व्यक्त करतील. त्याला जबाबदार कोण असेल माहीत नाही असा इशारा थेट पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह शिंदे फडणवीस सरकारला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.