Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत लसणाचे पदार्थ; होतात हे परिणाम

0

लसणाचे आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण कायमच असा विचार करतो की आपण आपल्या आहारात भाजी किंवा तत्सम तिखट पदार्थांमध्ये लसणाचा वापर करून घ्यावा. लसूण आपण वेगवेगळ्या तिखट पदार्थांमध्येही घेऊ शकतो. लसणानं आपल्या आहारात भाज्यांना, आमट्यांना चवही येते. त्याचसोबत आजारपणातही आपल्या लसणाचा आपल्या पदार्थांमध्ये वापर करून घेता येतो. हिवाळ्यातही आपण लसणाच्या पदार्थांचा उपयोग करून घेऊ शकतो.

लसणाची खासियत म्हणजे आपण आपल्या फोडणीत किंवा तडक्यातही लसणाचा वापर करून घेतो. लसणाचे असेच एक नाही तर अनेक फायदे असल्याने आपल्याला लसणाचा आपल्या आहारात खूप फायदा होतो परंतु तुम्हाला माहितीये का की काही लोकांसाठी लसूण खाणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तेव्हा जाणून घेऊया कोणाला लसणाचे नक्की साईड इफेक्टस काय आहेत? कोणत्या लोकांनी लसूण खाणं टाळावे?

काही लोकांना अनेकदा काही रोग किंवा आजारपणं जन्मत: असतात पण अशा काही शारिरीक अवस्थेतील लोकांनी लसूण न खाल्लेली बरी. खासकरून जी लोकं रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेतात त्यांनी तरी निदान लसूण खाऊ नये. त्याचबरोबर ज्यांना घामामुळे शरीराला दुर्गंध येतो आणि तोंडाला वास येतो त्यांनी लसणाचे सेवन करू नये. ज्यांना अशा समस्या आहेत त्यांनी लसणाचे सेवन केल्यास त्यांना काही समस्या अधिक येऊ शकतात.

तसेच लसूण आणि लसणाचे पदार्थ खाऊ नयेत. ज्यांना एसिडिटीचा त्रास आहे त्यांनी खासकरून लसूण हा पदार्थ खाऊ नये. त्याचसोबत जर तुम्हाला एसिडिटीचा त्रास खूप दिवस असेल किंवा तो वाढत असेल तर कृपया करून लसणाच्या पदार्थांपासून लांब राहा. तुमची समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ज्यांचे पोट कायम खराब राहते त्यांनी तर लसणाचे पदार्थ खाऊ नयेत. रिकाम्या पोटीही अशांना अशाप्रकारे लसणं खाऊ नये त्यानं तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.