Latest Marathi News

BREAKING NEWS

“‘या’ चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा, तडफडून मरतील”

0

 

राज्यात 20 जूनला झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावला आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार उलथवून टाकत भाजप- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचे सरकार आणले. या झालेल्या सत्ताबदलामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट बुधवारी आपल्या मतदारसंघात परतले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत आदींवर जोरदार हल्ला चढवला. “या चांडाळ चौकडीला मातोश्रीची दारे आठ दिवस बंद करा. हे तडफडून मरतील,” असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “एखाद्याचा राग समजू शकतो. पण ५० आमदार जातात तेव्हा त्याचे गांभीर्य समजून घेत नाहीत. आजही ते गर्वात आहेत, गेले तर गेले, गेले तर गेले, असे म्हणून-म्हणून शिवसेना संपवण्याच्या मागे ही जी चांडाळ चौकडी लागली आहे ना, ती उद्धव साहेबांच्या लक्षात यायला हवी,” असे माझे मत आहे. आता शिरसाठ यांच्या या विधानावर संजय राऊत या प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.