Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार

0

हातकणंगले मतदार संघासह पाच ते सहन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना लाडावणार असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधयसखा आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली यहेते केले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघाचे सध्याचे खासदार धेर्यशील माने यांना तगडे आवाहन राज्य शेट्टी देणार असल्याचे चिंता दिसून येत आहे.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. हातकणंगले सोडून या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार? त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच सेंद्रिय खताबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले की, सेंद्रिय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, सेंद्रिय शेतीच्या नावाखाली प्रचंड बुवाबाजी, फसवणूक चालू असल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे जाणे हा वेडेपणा ठरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. ते सांगलीत अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सेंद्रिय शेती वाढली, तर जगामध्ये अन्नधान्याचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रिय शेती करावी या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला, त्यावेळी देश सेंद्रिय शेती करत होता. रासायनिक खते, कीटकनाशके माहीत नव्हते. त्यावेळी लोकसंख्या 35-40 कोटींच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून या देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.