Latest Marathi News

BREAKING NEWS

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; खडसेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप  

0

 

 

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम न करता बिले काढण्याची स्पर्धा लागली आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने ९ कोटी रुपयांचं बिल काम न करता काढलं.

 

तसेच नियमबाह्य कामांना स्थगिती देत हा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार विकासकामं मंजूर करुन आणतात अन् काम न करता ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बिले काढतात, असं ते म्हणाले. याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.

 

यात उच्च न्यायालयाने तिन्ही अधिकाऱ्यांना नोटीस काढल्या आहेत. एक रुपयांचं काम न करता, कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढली जातात तसंच ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण दिलं जातं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र असे प्रकार सुरु असल्याचा आरोपी खडसेंनी केला आहे. हा प्रकार चौकशीतून समोर आला आहे.आता उच्च न्यायालनेही त्याची नोंद घेतली आहे, असं सांगत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत. यावर एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की, या दोघांचा मी स्वागत करतो. शेकडो कामं मंजूर आहेत मात्र त्यांना स्थगिती दिली आहे तर काही कामे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. विकासकामांची स्थगिती उठवावी आणि इतर कामांना मंजूरी द्यावी, तसंच विकासकामांना गती द्यावी अशी विनंती करतो, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.