भाजी विक्रेत्याचा मुलाने केली यूपीएससी क्रॅक; यूपीएससी उत्तीर्ण सिद्धार्थ भांगेचा चंद्रकांत पाटील यांनी केला सत्कार
पुणे |
पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने नुकतीच यूपीएससीची सीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पुण्यातील खराडी इथे राहणाऱ्या सिद्धार्थ किशोर भांगे याने दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळवलं असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही त्याचे कौतुक केले. आज आपल्या निवासस्थानी सिद्धार्थचा सत्कार करुन, भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील यंदाच्या सर्वच यूपीएससी यशवंतांचे कौतुक आहे. मात्र सभोवतालचे वातावरण आव्हानात्मक असतानाही केवळ आपल्या आई-वडिलांवरील श्रद्धा, स्वतःवरील विश्वास आणि आपल्या अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर यशश्री खेचून आणणाऱ्या पुण्याच्या खराडी भागातील सिद्धार्थ भांगे याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे. यूपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण समजले जाते त्यामध्ये भांगे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी कोथरुड मधील निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कोल्हापूरच्या विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील आणि सिद्धार्थचे पालक उपस्थित होते.