शेकडो वर्षे या संप्रदायाने भक्ती आणि समतेची परंपरा महाराष्ट्रात रुजवली आणि फुलवली. महाराष्ट्राला मिळालेला हा अमूल्य ठेवा आहे.
या परंपरेचे पाईक असणारे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बंडातात्या कराडकर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे, ॲड. माधवीताई निगडे, आळंदी देवस्थानचे डॉ. भावार्थ देवरणे, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज, माणिक महाराज मोरे, पांडुरंग बोवा घुळे, नरहरी महाराज चौधरी, कबीरबोवा लोढे, संजय भुंडरे, विलास बालवडकर यांनी श्री. चंद्रकांत पाटील यांचे त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट दिली आणि पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
