Latest Marathi News

BREAKING NEWS

नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तैलचित्राचे जहाजेवर अनावरण..!!

0

मुंबई : भारतीय व्यापारी नौदल अधिकारी विश्वनाथ श्रीधर गायकवाड यांच्या सकल्पनेतून साकार झालेल्या मानवतेचा संदेश देणाऱ्या तेलचित्राचे साई ब्लक ट्रडिशन या व्यापारी जहाजावरती, जहाजाचे कॅप्टन एल्विस ज्याकॉब,चीफ इंजिनिअर, निबू इसाक ज्याकॉब यांचा हस्ते अनावरण करण्यात आले.

या वेळेस विश्वनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व्हिस टू ह्यूमॅनीटी इज सर्व्हिस टू गॉड, मानवतेची सेवा हीच खरी ईश्र्वर सेवा हे स्वामी विवेकानंदांचे ब्रीद आणि महापुरुषाचे विचार डोळ्यासमोर ठेऊन माझ्या जीवनाचा प्रवास चालू आहे. जहजा वरती काम करताना वेगवेळ्या जाती धर्माचा तसेच वेगवेगळ्या राज्यातील आणि देशातील लोकांन बरोबर काम करावे लागते हे काम करत असताना जात, पात,धर्म,आणि राज्याचा किंवा देशाच्या सीमा ह्या माणसामध्ये भेद निर्माण करू शकत नाहीत.

माणसाने माणसाची काळजी घेत एकमेकांना सोबत घेत काम करणे गरजेचे आहे .हीच खरी ईश्र्वर सेवा आहे आणि याच जाणिवेतून हे तेलचित्र त्यानी बनवले आहे असे प्रतपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला जहाजावरील विविध राज्यातील महाराष्ट्र, गुजरात ,तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तरप्रदेश, गोवा, येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विश्वनाथ गायकवाड यांचे विशेष कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.