Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न

0

राज्यात शासकीय स्तरावर 75 हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील म्हणाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी सहा ठिकाणी अशा स्वरुपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दोन हजार 33 उमेदवारांना आज नियुक्ती पत्र देण्यात येत आहेत.

बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश असल्याचे पाटील म्हणाले. कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केलं. उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.