Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात पुन्हा लॉकडाऊन, मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई: सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सामान्य जवजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दुसरीकडे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.

देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या काळात करोनाच्या प्रमाणात कुठेही घट होताना दिसत नाही. उलट सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढतच आहे. अशातच गर्दी झाल्यास पुन्हा एकदा टाळेबंद करावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिला होता. यानंतर १५ जूननंपासून लॉकडाऊन कडक होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.