Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षांशी बोलणी सुरू, एकजूट व्हावच लागेल

0

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकर इगतला मोठा धक्का लागून शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे या निकालानंतर शिंदे गटाने एकचं जल्लोष केला असून दुसरीकडे स्थानिक पातळीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी थेट शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तसेच भाजप विरोधात सर्वांना एकत्र करण्यासाठी उद्धव ठाकरे बोलणी करर्णात असल्याचे विधान राऊत यांनी केलं आहे

देशात आता न्याय आणि सत्याच्या बाजूनं निकाल दिला जात नाही. त्यामुळे जनतेच्या कोर्टात जाणून सत्याची बाजू मांडावी लागणार आहे आणि यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे, तसेच मागच्या दोन दिवसांपासून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाशी उद्धव ठाकरे त्यांच्या नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीला आता ४०० दिवस उरले आहेत. यादृष्टीनं भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठीचे काही प्रयत्न सुरू आहेत का? असं विचारलं असता संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी महत्वाचं विधान केलं. “देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आता एकत्र येणं गरजेचं तर आहेच. पण यासाठी उद्धव ठाकरे देखील पुढाकार घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांचं गेल्या दोन दिवसांपासून देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांशी फोनवरुन बोलणं सुरू आहे”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.