तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचण्याच्या मुद्यावरून थेट आवाहन दिले होते यावरून चांगलंच वाद पेटला होता. मात्र पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. यावेळी रवी राणा यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार, तिथे नवनीत राणा त्यांच्याविरोधात लढतील, अशी घोषणाच राणा यांनी केली.
लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालिसा’ म्हणण्यावरून नवनीत राणा आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. उद्धव ठाकरेंवरही राणांनी टीकास्त्र सोडलं होतं. तर याच आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी राणांवर कारवाई करत त्यांना ताब्यातही घेतलं होतं.
आता पुन्हा राणा आणि ठाकरे आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, राणांनी ठाकरेंना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाबाबत मातोश्रीवर बैठक घेतली आहे. त्यावरून रवी राणांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे कोणत्या जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. ज्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे निवडणूक लढणार, तिथे त्यांच्याविरोधात नवनीत राणा उभ्या राहतील, अशी घोषणाच रवी राणांनी केली.
अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयातील घटनेवरून कुरघोडी करू नये; रामदास आठवलेंचा सल्ला
कोल्हापुरात रिक्षावाल्याचा चुकीने ३ निष्पाप जीवांना गमवावा लागला जीव