Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे सारखा दिलदार मुख्यमंत्री होणे नाही, काँग्रेसच्या या नेत्यांने केले तोंडभरुन कौतुक

0

उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात विविध मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे, एकीकडे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस सुरू असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केले आहे उद्धव ठाकरे दिलदार आहेत. असा मुख्यमंत्री होणे नाही, असे कौतुकोद्गार काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.

एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा राजीनामा दयावा लागला होता. राज्यात शिंदे भाजप सरकार स्थापन झाले. अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ सरकार कोसळत होते त्यावेळीचा एक किस्सा सांगितला. ज्यावेळेस सरकार कोसळत होते, त्यावेळी काही लोकांनी उल्लेख केला की काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे आम्ही शिवसेना सोडून चाललो आहे, त्यानंतर उद्धवजी राजीनामा देण्यासाठी जात होते त्यावेळी मी त्यांना सांगितले आमची भूमिका स्पष्ट आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर सत्तेत असल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेस पक्ष तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले पाहिजे, तुम्ही तुमचा कार्यकाळ पाच वर्ष पुर्ण केला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले मी देखील मुख्यमंत्री राहिलो पण असा उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही असे जाहीरपणे सांगतो, असे म्हणत चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.