Latest Marathi News

BREAKING NEWS

…….त्या दिवशी रमेश देव यांनी तांबडा रस्सा चाखला आणि त्यांना रडू कोसळले

0

मुंबई | युटूबर स्मिता देव यांची ज्वेलरी ओळख करून द्याची गरज नाहीये. स्मिता देव या दिग्दर्शक अभिनय देव यांच्या पत्नी, तसेच दिगवंत अभिनेता रमेश देव यांच्या सुनबाई आहेत, तसेच स्मिता देव या एक लोकप्रिय लेखिका आणि युट्यूबर आहेत. विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींवर आधारित त्यांच्या अनेक व्हिडीओच्या पाककृती आज जवळपास सर्वांच्या स्वयंपाकघरात केल्या जातात.

काही दिवसांपूर्वी स्मिता देव यांनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
‘रमेश देव कोणत्याही प्रकारचं डाएट करत नव्हते. जे आवडायचं ते पदार्थ ते अगदी मनसोक्त खायचे. गोड पदार्थ त्यांच्या आवडीचे. घरी केलेलं जेवण त्यांना विशेष आवडायचं, असं स्मिता देव यांनी सांगितलं.

यावेळी रमेश देव यांचा एक किस्साही त्यांनी आवर्जुन सांगितला. त्यांनी सांगितलं की, ‘घरी पाहुणे येणार होते. त्यांच्यासाठी मी पारंपरिक असा तांबडा पांढरा रस्सा करायला घेतला. मी स्वयंपाकघरात असताना बाबा (रमेश देव) आलेत. छोटी काय करतेय, मला जरा चव चाखायला दे, असं मला म्हणाले. मी त्यांना तांबडा पांढरा रस्सा चाखायला दिला. त्यांनी तो चाखला आणि अचानक ते रडू लागले.

बाबा असे अचानक का रडताहेत, मला कळेना. नंतर त्यांनीच मला कारण सांगितलं. तू केलेल्या रस्स्याची चव घेतली आणि मला माझ्या आईनं केलेला रस्सा आठवला, असं ते म्हणाले. ‘ हे सांगताना स्मिता स्वतःही भावुक झाल्या होत्या. प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं गेल्यावर्षी २ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पुढे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थी कोल्हापुरातील पंचगंगा नदीत विसर्जित करण्यात आल्या रमेश देव यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ नातं होत.

Leave A Reply

Your email address will not be published.