Latest Marathi News

BREAKING NEWS

‘तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा’, संजय राऊत संतापले

0

पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला असून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललो आहे. त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

‘हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केला. मी अजून नोटीस वाचली नाही माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही.माझ्या हातात नोटीस असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो, इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल, असंही राऊत म्हणाले.

या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेलं आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं मी काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो
बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे, असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे, त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ‘संदीप देशपांडेंवर कोण आहेत ते? कुठे राहतात ते? कोणत्याही नागरिकांवर या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही, कुणी असेल सामन्य कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल. मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगणं हे सणसनाटी निर्माण करण्यासाठी करत असल्याचे असं सांगणं हे हल्लेखोरांना बळ मिळत आहे, जिथे निवडणुका असेल तिथे जाऊन कायदा आणि सुवस्था हातात घेतली जाते, असं असेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.