Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी तेथे सरशी – जलतरणात जागतिक विक्रमाकडे वाटचाल

0

बार्शीच्या फ्लिपर्स स्विम क्लब मधील १० जलतरणपटूंनी श्रीलंकेपासून भारतापर्यंत (पाल्क सामुद्रधुनी – ३० किमी) खुल्या समुद्रात पोहण्याचा ऐतिहासिक निर्धार केला आहे. उद्या, १० एप्रिल २०२५, या सर्व जलतरणपटूंनी एकत्र येऊन जागतिक विक्रमासाठी हा अद्वितीय सोहळा घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.या मोहिमेत सहभागी जलतरणपटू आहेत –१. स्वराज उमेश डोईफोडे (14), २. रणवीर सातपुते (१५), ३. जयसिंह शिंदे (१४), ४. माधव शिंदे (१४), ५. भार्गवी मुळे (१३), ६. शौर्य नवले (११), ७. तन्वी नवले (१०), ८. रुद्र नवले (१४), ९. स्निग्धा जगताप (१०), १०. शुभ्रा कडगंची या सर्वांनी याआधी विजयदुर्ग, मालवण, पोरबंदर आणि कोची येथे सागरी जलतरणात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे.या स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व परवानगी भारत व श्रीलंका सरकारकडून घेण्यात आलेली आहे. कोच बाळराजे पिंगळे (National Swimmer, Ironman) यांचे मार्गदर्शन व प्रेरणा यामागे मोलाची आहे.या धाडसी उपक्रमासाठी बार्शी रनर्स क्लब, बार्शी सायकलिंग क्लब, वृक्ष संवर्धन समिती आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच जिल्ह्यातील व बार्शीतील अनेक राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर यांनी या स्पर्धेसाठी sponsorship स्वीकारलेली आहे. तसेच संपूर्ण बार्शीकरांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं आहे.या सर्व जलतरणपटूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा!बार्शीच्या मातीतील ही ऊर्जा, ही उमेद आणि हा आत्मविश्वास अखंड तेजाळत राहो!

Leave A Reply

Your email address will not be published.