Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथरुडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रकांत पाटील यांच्याकडून अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध

0

पुणे, ०६ नोव्हेंबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरुडमधील नागरिकांना जेवढ्या गोष्टी सोयीस्कर करून देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करत असतात. कोथरूडमधील प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे.

चंद्रकांत पाटील दरवर्षी अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देत असतात. यंदाही हा उपक्रम कोथरुड मतदारसंघात राबवित असून, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण मधील नागरिकांसाठी आज त्यांच्या बाणेर मधील जनसंपर्क कार्यालयात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे. याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.