बार्शी |
शिवाजी कॉलेज बार्शी येथे पुढील ऍडमिशनची चौकशी करून येतो असे घरातून सांगून गेलेला सौरव कैलास लोकरे, (वय १७ वर्षे ९ महिने) रा. बीडिओ क्वाँर्टर शिवाजीनगर बार्शी हा अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता झालेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची फिर्याद कैलास प्रल्हाद लोकरे (वय ४९) शहर पोलिसात दिली आहे. त्यांचा मुलगा २० जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास शिवाजी कॉलेज येथे ऍडमिशन ची चौकशी करून येतो असे सांगून गेला परंतु अद्याप पर्यंत घरी आलेला नाही. कुणीतरी आणल्या तेच माने अज्ञात कारणावरून पळवून अपहरण केल्याची फिर्याद शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तरी हा मुलगा कोणाला आढळून आल्यास बार्शी शहर पोलिसांची संपर्क करावा असे आवाहनही पोलीस नाईक एस.बी. खराडे यांनी केले आहे.
संपर्क बार्शी शहर पोलीस स्टेशन : ०२१८४-२२३३३३
पोलिस नाईक एस बी खराडे :८८८८८९४२३८