Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार, महत्त्वपूर्ण ठरावांवर शिक्कामोर्तब

0

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळाने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय(संक्षिप्त स्वरुपात) :

  • राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
  • गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
  • आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
  • मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी ( महसूल विभाग)
  • महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
  • केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम.
  • सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे ( सहकार विभाग )
  • दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन (विधी व न्याय विभाग )
  • मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)

Leave A Reply

Your email address will not be published.