Latest Marathi News

BREAKING NEWS

२ ऑगस्ट २०२७ रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याचे पहिले शाही स्नान होणार

0

३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात

नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, दि. १ जून रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ््याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी १२ वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल तर साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होईल तर २४ जुलै २०२८ रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखासुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.

२९ जुलै २०२७ रोजी नगर प्रदक्षिणा होईल तर पहिले अमृतस्नान हे सोमवार दि. २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्नान होणार आहे तर या महाकुंभातील दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे तर तिसरं आणि शेवटचे अमृतस्नान हे ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे होईल तर २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील, असे सांगण्यात आले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला १० शैव आखाड्यांचे २० महंत तर ३ वैष्णव आखाड्यांचे ६ महंत उपस्थित होते. या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेसुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.