Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम सर्व देशवासीयांनीही एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला – चंद्रकांत पाटील

0

पुणे, २३ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या सांगतेवेळी सर्व देशवासीयांना मातृभूमीला अभिवादन करण्याचे आवाहन केले. यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात आला. सर्व देशवासीयांनीही हा उपक्रम एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकल्पनेत सहभाग घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि आज हा उपक्रम म्हणजे लोकसहभागातून चालविण्यात आलेली चळवळ झाली आहे. या उपक्रमाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यभरात ‘सेल्फी विथ माय सॉईल’ ही संकल्पना राबविण्याचे निश्चित करुन; त्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. आज हा संकल्प सिद्धीस जात असताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कडे वाटचाल करत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज या संकल्पनेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.