Latest Marathi News

BREAKING NEWS

मनःपूर्वक आभार! – आमदार चंद्रकांतदादा पाटील

0

आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. महायुतीला राज्यातील जनतेने दिलेला बहुमताचा कौल ही ऐतिहासिक घटना आहे. महायुती मंत्रिमंडळात पुन्हा एकदा सहभागी होण्याचा बहुमान मिळणे ही माझ्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेले महायुती सरकार विकासाचा संकल्प पूर्ण करून नवीन आयाम प्रस्थापित करेल यात तीळमात्र शंका नाही. आज मंत्रीपदाची शपथ घेताना महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानून नव्या विकासपर्वाच्या वाटचालीत समर्पित भावनेने काम करण्याचा संकल्प करतो. महायुती मंत्रिमंडळात मंत्रिपदाची पुन्हा जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे पी नड्डाजी, मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

आपला
आमदार चंद्रकांतदादा पाटील
मंत्री-महाराष्ट्र राज्य

Leave A Reply

Your email address will not be published.