Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश म्हणजे फुसका बार

0

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 12 नगरसेवक हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र, यावर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे वावड्या उठवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे गटात ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा प्रवेश म्हणजे फुसका बार असल्याचे देखील बडगुजर म्हणाले. कुणीही शिंदे गटात प्रवेश करणार नाही .तसेच शिंदे गटात खासदार गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. असे बडगूजर यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर नाशिकमध्ये सध्या तरी ठाकरे गटाचा दबदबा आहे. एक खासदार आणि दोन आमदार वगळता कुठलाही मोठा चेहरा शिंदे गटात गेलेला नाही. त्यातच शिंदे गटात तिन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये राजकीय वाद पेटला आहे. हे पाहता शिंदे गटाकडून आपली ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटातील नगरसेवक, पदाधिकाऱ्याना आपल्या गटात खेचण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.