Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख सदस्यत्वाचे अर्ज दाखल

0

शिवसेनाठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत.

ठाकरे गटाने याआधी साडेआठ लाख आणि आज अडीच लाख सदस्यत्व अर्ज दाखल केले आहेत. सोबत एकूण 2 लाख 62 हजार शपथपत्र देण्याचा इरादा आहे. त्यापैकी आतापर्यंत 70 हजार शपथ पत्र दाखल करण्यात आली आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट, दोन्हीकडूनही आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाला सादरकरण्यात येत आहेत. मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.

ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाकडून दोन वेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.