Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडे खेचण्याचा प्रयत्न ?

0

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेनी कंबर कसली आहे. ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना शिंदे गटात खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहे. ऋतुजा लटके यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत.

भाजपच्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे पाहता भाजपाकडून आद्यपही मुरजी पटेल यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले होते.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार रिंगणात उतरेल का , याबाबत कोणतेच चित्र स्पष्ट झालेले नाही.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता शेवटच्या दोन दिवसांत काही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेही ठकरे गटातील उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे.त्यामुळे ऋतुजा लटके यांची बाजू भक्कम झाली होती. परंतु, आता ऋजुता लटके यांनाच गळाला लावण्यासाठी शिंदे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.